सोमवार, १९ एप्रिल, २०१०

आनंदाश्रम , नेरूळ,नवीमुंबई

आनंदाश्रम , नेरूळ,नवीमुंबई
नेरूळ येथील आनंदाश्रम या वृधाश्रामाला भेट देण्याचा योग आला. तेथील वातावरण पाहून खूप समाधान वाटले. या आश्रमात दोन तर्हेच्या खोल्या उपलब्ध आहेत प्रत्येकासाठी स्वतंत्र किंवा दोघाजनात एक निवड तुमची. तसेच वृद्धाच्या भेटीला येणाऱ्या पाहुण्यासाठी एक खोली राखून ठेवली आहे. सर्व खोल्या प्रशस्त असून स्वच्छ ठेवल्या जातात. आवारात फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे वातावरण प्रसन्न असते. येथील रहिवाश्यांना सकाळी ६ वाजता चहा, ८.३० वाजता नाश्ता, १२ वाजता जेवण, संध्याकाळी ४ वाजता चहा आणि रात्री ८ वाजता जेवण दिले जाते. करमणुकीसाठी दूरदर्शन संच सभागृहात आहे. वृद्धाना या सोयी वाजवी किमतीत उपलब्ध करून दिल्याब्द्धल ब्राम्हण सेवा मंडळाला धन्यवाद.
येथील राहिवाश्याबरोबर गप्पा मारताना सर्वजण मजेत असल्याचे जाणवले. एक ९१ वर्षाचीमुख्य्ध्यपिका येथे रहात आहेत. तसेच लेखिका वंद्दना विटणकर देखील येथे आहेत.
हा आश्रम नेरूळ येथे डी. वाय. पाटील हॉस्पिटल जवळ आहे.