बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

शिवथर घळ







शिवथर घळ

शिवथर घळिला जाण्याचे बरेच दिवस मनात होते. तो योग ५ सप्टेम्बर २०१० रोजी आाला. छान पावसाळी दिवस होता.पाऊस बर्यापैकी कोसळत ्होता.पोलादपुरहुन राज्यपरिवहन मन्डळाच्या बसने एम.आय.डी.सी. फ़ाट्यावर उतरुन टमटमने बिरवाडीला आलो.येथुन परत टमटमने शिवथर मुक्कामी पोहोचलो.सुन्दर मठातील पवित्र वातावरणामुळे आपोआप नतमस्तक होतो. घळीमध्ये १०० फ़ूट उन्चिवरुन प्रचन्ड आवाज करित धबधबा कोसळत होता.घळिचे सभोवती डोन्गरावर गर्द झाडी होती मनात आज एवढे जन्गल आहे तर शिवाजी महाराजान्च्या काळात किती घनदाट जन्गल असेल कल्पनाच करता येत नाही. येथे दर्शन घेऊन परत् जाण्याच्या विचाराने आलो होतो परन्तु वातावराण भावल्यामुळे एक रात्र मुक्काम केला.
रहाण्यासाठी भक्तनिवासामध्ये खोल्यध उपलब्ध आहेत.रहाण्याचा खर्च म्हणुन आपणास योग्य वाटेल ती रक्कम देणगीरुपाने ध्यावी.अन्यथा राहण्याची सोय मोफ़त आहे. त्यात आपणास २ वेळ जेवण आणि २ वेळ चहा मिळतो.सकाळी स्नानासाठी गरम पाणी मिळते.रामदासस्वामिनी येथे साधना केली. तसेच "श्रीमत दासबोध " या ग्रन्थाची रचना केली. सुन्दर मठाची स्थापना केली. अफ़झलखान वधाचे वेळी स्वामिचा मुक्काम येथेच होता.
येथे रोज सकाळ-सन्ध्याकाळ नियमित उपासना होत असते. दुपारी दर्शनाला आलेल्या भक्ताना महाप्रसाद दिला जातो. सकाळची उपासना ५.३० वाजता तर सायन्काळी ६.३० वाजता असते. साधारणपणे उपासना तासभर चालते.
घळीमध्ये राम पन्चायतन,रामदास स्वामी आणि कल्याण स्वामिच्या अतिशय सुन्दर मूर्ती आहेत.तसेच उ्पासनेसाठी स्वतन्त्र सभा्ग्रुह आहे.
रामदास स्वामिचे साहित्य,तसेच सन्ताची चरित्र व मुलान्वर सन्स्कार करण्यासाठी छोटी छोटी पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मठातर्फ़े लहान मुले,महाविध्यालयीन विध्यार्थी, प्रापन्चिक, जे्ष्ट ्नागरिक, दासबोधाचे अभ्यासक यान्च्यासाठी सन्स्कार वर्ग, अभ्यास वर्ग,साधना सप्ताह नियमीतपणे आयोजित केले जातात.
कसे याल? मुम्बई-गोवा महामार्गावरून वरन्धा घाटातून भोर-पुण्याकडे जाताना बारसगाव येथून १५ कि.मी. अन्तरावर शिवथर घळ आहे. भोर, पोलादपूर, महाडहून बारसगाव पर्यन्त राज्यपरिवहन मन्डळाच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत.बारसगावहून टमटमने शिवथरळला जाता येते. मुम्बईहुन राज्यपरिवहन मन्डळाची एक बस रात्रिच्या मुक्कामाला असते व सकाळी ७ वाजता मुम्बईला रवाना होते.

२ टिप्पण्या:

  1. Sir, Uttam mala avadale he varnan ani ek eccha pan nirman zhali aahe pratyask bhet dyaychi

    aabhar

    Girish

    उत्तर द्याहटवा
  2. ‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत

    समर्थाचे २८ वर्षे वास्तव्य असलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील जागा हि सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज - आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व ऐतिहासिक पुरावे ह्या लिंक वर देत आहे
    http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4635985100503934906&OId=5580116005441001346&TName=

    उत्तर द्याहटवा