बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

शिवथर घळ







शिवथर घळ

शिवथर घळिला जाण्याचे बरेच दिवस मनात होते. तो योग ५ सप्टेम्बर २०१० रोजी आाला. छान पावसाळी दिवस होता.पाऊस बर्यापैकी कोसळत ्होता.पोलादपुरहुन राज्यपरिवहन मन्डळाच्या बसने एम.आय.डी.सी. फ़ाट्यावर उतरुन टमटमने बिरवाडीला आलो.येथुन परत टमटमने शिवथर मुक्कामी पोहोचलो.सुन्दर मठातील पवित्र वातावरणामुळे आपोआप नतमस्तक होतो. घळीमध्ये १०० फ़ूट उन्चिवरुन प्रचन्ड आवाज करित धबधबा कोसळत होता.घळिचे सभोवती डोन्गरावर गर्द झाडी होती मनात आज एवढे जन्गल आहे तर शिवाजी महाराजान्च्या काळात किती घनदाट जन्गल असेल कल्पनाच करता येत नाही. येथे दर्शन घेऊन परत् जाण्याच्या विचाराने आलो होतो परन्तु वातावराण भावल्यामुळे एक रात्र मुक्काम केला.
रहाण्यासाठी भक्तनिवासामध्ये खोल्यध उपलब्ध आहेत.रहाण्याचा खर्च म्हणुन आपणास योग्य वाटेल ती रक्कम देणगीरुपाने ध्यावी.अन्यथा राहण्याची सोय मोफ़त आहे. त्यात आपणास २ वेळ जेवण आणि २ वेळ चहा मिळतो.सकाळी स्नानासाठी गरम पाणी मिळते.रामदासस्वामिनी येथे साधना केली. तसेच "श्रीमत दासबोध " या ग्रन्थाची रचना केली. सुन्दर मठाची स्थापना केली. अफ़झलखान वधाचे वेळी स्वामिचा मुक्काम येथेच होता.
येथे रोज सकाळ-सन्ध्याकाळ नियमित उपासना होत असते. दुपारी दर्शनाला आलेल्या भक्ताना महाप्रसाद दिला जातो. सकाळची उपासना ५.३० वाजता तर सायन्काळी ६.३० वाजता असते. साधारणपणे उपासना तासभर चालते.
घळीमध्ये राम पन्चायतन,रामदास स्वामी आणि कल्याण स्वामिच्या अतिशय सुन्दर मूर्ती आहेत.तसेच उ्पासनेसाठी स्वतन्त्र सभा्ग्रुह आहे.
रामदास स्वामिचे साहित्य,तसेच सन्ताची चरित्र व मुलान्वर सन्स्कार करण्यासाठी छोटी छोटी पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मठातर्फ़े लहान मुले,महाविध्यालयीन विध्यार्थी, प्रापन्चिक, जे्ष्ट ्नागरिक, दासबोधाचे अभ्यासक यान्च्यासाठी सन्स्कार वर्ग, अभ्यास वर्ग,साधना सप्ताह नियमीतपणे आयोजित केले जातात.
कसे याल? मुम्बई-गोवा महामार्गावरून वरन्धा घाटातून भोर-पुण्याकडे जाताना बारसगाव येथून १५ कि.मी. अन्तरावर शिवथर घळ आहे. भोर, पोलादपूर, महाडहून बारसगाव पर्यन्त राज्यपरिवहन मन्डळाच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत.बारसगावहून टमटमने शिवथरळला जाता येते. मुम्बईहुन राज्यपरिवहन मन्डळाची एक बस रात्रिच्या मुक्कामाला असते व सकाळी ७ वाजता मुम्बईला रवाना होते.

बुधवार, २३ जून, २०१०

बदलती जिवन पद्दाती

बरेच दिवस झाले हा विषय मनात ्घोळ्त आहे.जागतिकिकरणाचे परिणाम आपल्या जिवन पद्दतिवर हौउ लागले आहेत.आजचे. तरुण आठ्वडाभर काम केल्यानन्तर सप्ताहाच्या अखेरिस सहलिला जातात किवा शनिवारी रात्री क्लब किन्वा होटेलमध्ये पार्टी करतात
त्यावेळी खान्या बरोबर मध्यपान देखिल चालते. हे कुठेतरी खटकते.हे आपल्या सन्स्कारत बसत नाही त्यावेळी फ़ळाचे रस किन्वा शितपेयान्चा उपयोग चालु शकेल.याचा जरुर विचार व्हावा.श्रमपरिहासाठी सहलिला जावे किन्वा पार्ट्या करण्यास काहिच हरकत नाही परन्तु मध्यपान टाळावे.
आजची पिढी स्वकेन्द्रित हौउ लागली आहे. ती तडजोड करावयास तयार नसते.

सोमवार, १९ एप्रिल, २०१०

आनंदाश्रम , नेरूळ,नवीमुंबई

आनंदाश्रम , नेरूळ,नवीमुंबई
नेरूळ येथील आनंदाश्रम या वृधाश्रामाला भेट देण्याचा योग आला. तेथील वातावरण पाहून खूप समाधान वाटले. या आश्रमात दोन तर्हेच्या खोल्या उपलब्ध आहेत प्रत्येकासाठी स्वतंत्र किंवा दोघाजनात एक निवड तुमची. तसेच वृद्धाच्या भेटीला येणाऱ्या पाहुण्यासाठी एक खोली राखून ठेवली आहे. सर्व खोल्या प्रशस्त असून स्वच्छ ठेवल्या जातात. आवारात फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे वातावरण प्रसन्न असते. येथील रहिवाश्यांना सकाळी ६ वाजता चहा, ८.३० वाजता नाश्ता, १२ वाजता जेवण, संध्याकाळी ४ वाजता चहा आणि रात्री ८ वाजता जेवण दिले जाते. करमणुकीसाठी दूरदर्शन संच सभागृहात आहे. वृद्धाना या सोयी वाजवी किमतीत उपलब्ध करून दिल्याब्द्धल ब्राम्हण सेवा मंडळाला धन्यवाद.
येथील राहिवाश्याबरोबर गप्पा मारताना सर्वजण मजेत असल्याचे जाणवले. एक ९१ वर्षाचीमुख्य्ध्यपिका येथे रहात आहेत. तसेच लेखिका वंद्दना विटणकर देखील येथे आहेत.
हा आश्रम नेरूळ येथे डी. वाय. पाटील हॉस्पिटल जवळ आहे.

मंगळवार, १६ मार्च, २०१०

गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :

१. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते 'शक' असा दोघांचाही अंतर्भाव 'शालिवाहन शक' यामध्ये करण्यात येतो.

२. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.

गुढीपाडवा असा साजरा करावा!

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने 'नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.

निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।

ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।

कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।

भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.

पंचांगाचे महत्त्व

गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्ाावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.

कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वषेर् आहेत. त्यापैकी पाच हजार १०९ वषेर् झाली. येत्या रविवारी गुढीपाडव्याला ५११० वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. 'योग' हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग 'करवा' हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.

बुधवार, १० मार्च, २०१०

महिला आरक्षण विधेयक:

महिला आरक्षण विधेयक:
अखेर महिला आरक्षण विधेयकाचा १४ वर्षाचा वनवास संपला. राज्यसभेत १८६ विरुद्ध १ मताने विधेयक मान्य करण्यात आले. महिलांना यामुळे राजकारणात येण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्त्री ही जात्याच चांगली व्यवस्थापक आहे. उपलब्ध साधनांनी संसार कसा करावा हे ती जाणते. तिच्या या कौशल्याचा फायदा देशाचे गाडे चालविण्यास निश्चितच होईल असी अशा करू या.